Walk to Guru’s Glory ! Take Back Memories of Kingdom !

6 Mar

IMG_2992 ऑगस्ट महिन्यात मी भूतानला गेले होते. Rather, मला जायला मिळालं ते एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. Mountain Echoes या नावाचा एक English Literary Festival. तीन दिवसांच्या या पुस्तकी discussions नंतर मी ठरवलं भूतानच्या 10,000 फूट उंचीवर असलेल्या ताकसांग मोनॅस्ट्रीला भेट द्यायची. हा ट्रेक भूतनीज लोकांसाठी खूपच auspicious आणि बाकी पर्यटकांसाठी त्यांच्या फिटनेसची परीक्षा घेणारा. एका डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही चढण सुरू करता ते दुसर्‍या डोंगराच्या टोकापर्यंत जाण्यासाठी.
मी पहिल्यांदाच हा ट्रेक करत होते. पारो शहरापासून तुम्ही 300 रुपयांची लोकल टॅक्सी करून 10 किमी दूर आल्यावर Tiger’s Nestच्या पायथ्याशी पोहोचता. तुम्ही कधी हिमाचल प्रदेशात गेला आहात का? तिथलं निसर्ग सौंदर्य इथं कॉपी पेस्ट केल्यासारखं वाटेल. पण जरा जास्त शुद्ध हवा आणि कमी वस्ती! हा देश पर्यटकांसाठी भुकेला नाही! म्हणूनच आजही इथली बहुतेक प्रेक्षणीय स्थळं, स्वच्छ, सुंदर आणि untouched आहेत.
ताकसांग मॉनेस्ट्रीला टायगर्स नेस्ट या नावानंही ओळखलं जातं. Tiger’s Nest या नावाला मोठा इतिहास आहे. जो भूतानच्या इतिहासाशी जोडलेला आहे असं म्हणतात. गुरु रिंपोशे, ज्याने भूतानमध्ये बुद्ध धर्माची स्थापना आणि प्रसार केला. ते तिबेटवरून एका वाघिणीच्या पाठीवर स्वार होऊन आले आणि त्यांनी इथे वास्तव्य
 केलं. ध्यानस्थ होऊन ते अनेक वर्षं इथेच राहिले. वाघिणीचं वास्तव्य इथं होतं म्हणून नाव पडलं Tiger’s Nest.

flags and taksang

 

खाली उभं राहून जेव्हा धुक्यात हरवलेल्या त्या मॉनेस्ट्रीकडे तुम्ही पाहता तेव्हा तुमच्याही मनात माझ्यासारखा एकच प्रश्न येईल. “इतक्या उंचीवर का बरं ते राहायला गेले? आणि एवढी मोठी monastery तरी कशी काय बांधली तिथे… पण काही प्रश्न  मोठ्ठयांनी बोलायचे नसतात…. आणि म्हणूनच मी माझ्या ट्रेकर मित्राच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रेक सुरू केला! पण वाटेत काही interesting गोष्टी दिसल्या त्या माझ्या फोन कॅमेरामध्ये टिपत गेले. ट्रेकची सुरुवात होते ती एका छोट्या मंदिरापासून. हे मंदिर पारो चूचं मंदिर… ‘chu’ या शब्दाचा अर्थ भूतनीझ भाषेत नदी किंवा पाणी असा होतो…
हा ट्रेक तीन टप्प्यांत विभागला आहे. पहिला पडाव, म्हणजे 2 तासांची खडी चढण. मग दुसर्‍या टप्प्यात आणखी एक तासांचा ट्रेक. इथं मातीत हरवलेल्या काही पायर्‍या आहेत. पण रस्ता नागमोडी आहे. म्हणून चढण आणखी तीव्रपणे जाणवते. त्यात अनेक वळणं दरीत डोकावणारी आणि भीती तुमच्यासोबत चढू लागते. बापरे! हे सगळं अव्हॉईड करायचं असं आम्ही ठरवलं आणि जंगलातला रस्ता घेतला. आजूबाजूला झाडं असली की मेंटल स्ट्रेस तेवढा कमी होतो. पण physical stress चं काय? त्याला पर्याय नाही! आता एकदा ठरवलं ना, की मग ‘no looking back’…

मध्ये मध्ये पाण्याचा घोट घेत… चलते रहो! त्या उताराच्या रस्त्यावर कोणीच नव्हतं. मनात उगाच शंका, ‘आजही इथं कोणी वाघ नसेल ना!’ सगळे विचार खोडून परत चालायचं. तेव्हाच एक भूतनीझ मुलगा वरून खाली येताना आम्हाला दिसला. त्याला माझी दमलेली अवस्था पाहून हसू आलं. पण त्याला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की आम्ही हा जंगलाचा रस्ता कसा काय घेतला! हा रस्ता टुरिस्ट सहसा नाही घेत. ते सगळं सोड रे, मी मनात म्हटलं, “इथून अजून किती दूर आहे ते सांग?” हे मी वैतागून मोठ्याने म्हटलं. “अजून फक्त अर्धा तास” हे ऐकून मला हुश्शSS झालं! पण अर्धा तास फक्त हा पहिला टप्पा संपण्यासाठी.

Flags on the way

खूप थकवा, कंटाळा जाणवू लागला की थांबून आजूबाजूला एक नजर टाका. असंख्य तिबेटी prayer flags दिसतील. त्या रंगीत पताका, तुम्हाला आणखी पुढे जाण्याची उमेद देतात. एका झाडापासून दुसर्‍या झाडापर्यंत मोठ्या उस्ताहाने लावलेले हे prayer flags!

अशाच एका झाडापाशी आम्ही थांबलो. तिथून संपूर्ण दरी दिसत होती. GPS चेक केलं तर आम्ही समुद्रसपाटीपासून 4000 फुटांच्या उंचीवर होतो. 12 वाजताचं उन डोक्यावर, खरं तर तुम्ही हा ट्रेक पहाटे केला तर उत्तम. पण सगळ्याच उत्तम गोष्टी आपल्यासोबत होतील असं काही नाही, हा अनुभव घेणं महत्त्वाचं होतं!

हा ट्रेक आम्ही ज्या मार्गानं करत होतो, त्या मार्गाने आम्ही झटपट पहिल्या स्टॉपपर्यंत पोहोचलो. अगदी अर्ध्या वेळेत. म्हणजे एका तासात. इथं आल्यावर भूतान टुरिझमला सलाम करावासा वाटला. किती विचारपूर्वक हा स्टॉप क्रिएट केला आहे. इथं एक छोटंसं restaurant आहे.                                                                                                                                                                                

tea cups

window

लाकडी फर्निचरमुळे इथल्या डेकॉरला आणखी शोभा येते. एकदम ENGLISH लूक आहे. रेस्टॉरन्टच्या बाहेर काही लाकडी बाकं, खुर्च्या आणि जे जे सुंदर दिसेल असंच फर्निचर बनवलं होतं. आम्ही चहा घेतला. जरा तर-तरी यावी म्हणून आणि साखरही पोटात जावी म्हणून. अनेक भारतीय ट्रेकर्सची ही वर्षानोवर्षांची ही परंपरा. आम्ही भूतानमध्ये ही कायम ठेवली.  इथे कोरा चहा मिळतो. चहाच्या counter जवळची खिडकी या लव्ह नोट्सनं सजलेली होती. चहा घेऊन आम्ही बाहेरच बसलो. सनसेट-सनराईज पॉईंटचं लॉजिक इथं लावलं तर या जागेला Monastery Point म्हणता येईल.

इथून तुम्ही समोरच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या Monasteryचा नजारा पाहत पाहत चहाचा लुफ्त घेऊ शकता. पण जास्त वेळ थांबलो नाही इथे. मोमेन्टम लूज व्हायला नको.

the cafeteria

पुढचा प्रवास अधिक सोपा आहे असं नाही म्हणणार. कारण थोडा वेळ चालल्यावर त्या जीवघेण्या पायर्‍यांपाशी तुम्ही पोहोचता. 350 पायर्‍या! काही उतरत्या, तर काही चढत्या! इथं रेलिंग नाही, कशाचाही आधार नाही!

bhutan monastery

आपणच आपला बॅलन्स सांभाळत उतरायचं. डोळ्यांच्या कोपर्‍यातून दरीत पाहिलं तर एक क्षण भोवळ आल्यासारखी वाटते. पण ही भीती टाळायची असेल तर समोर दिसणार्‍या monastery कडे पाहत हळू हळू पावलं टाकायची… त्या पायर्‍या जिथे सुरू होतात तिथून monastery लख्ख दिसते. एका आय लेव्हलवर आणि हाच आहे तुमचा फोटो पॉईंट. इथून तुमचे monastery बॅकग्राऊंडला ठेऊन चांगले फोटो येतात. या monastry ला जाऊन आले असं सांगणारे बहुतेक Facebook photos इथेच काढलेले आहेत. मी पण एक काढला! 😛

पावसामुळे या पायर्‍या निसरड्या झाल्या होत्या. आता आपल्याला कधी एकदा मॉनेस्ट्रीला पोहोचते असं वाटत असलं तरी पाय जरा जपून, सावकाश टाकावा. एका बाजूला उतरत्या पायर्‍या आणि दुसर्‍या बाजूला चढत्या पायर्‍या .. या दोन्ही ला जोडणारा एक पुल .. लाकडी पूल … दरीकडे डोकावून पाहणारा… त्या पूल च्या डोक्यावर धब धबा… एकदम strategic location वाटली मला या धबधब्याची … घामाने डब डबलेल्या… दमलेल्या …लोकांना थंड शिंतोड्यांनी सुखावणारा… आणि रंगीत पताकांनी स्वागत करणारा तो पूल.
इथं जास्त काळ न थांबलेलच बरं ! उगाच कावळा बसायला आणि फांदी तुटायला निमित्त नको…!
पाय-या चढून आम्ही आत गेलो. इथं तुम्ही पुर्ण वस्त्रात जावं असा आग्रह. शॉर्ट्स, बिना बाह्यांचे कपडे इथं चालत नाहीत. तुमचे कपडे इथल्या अशीका-यांना अयोग्य वाटले तर ते तुम्हाला लांब हाता पायांचे कपडे देतात. पण अनेक लोकांनी घालून टाकलेले कपडे घालायची मजबूरी तुम्हाला टाळायची असेल तर पुर्ण कपडे घालून जायचा सल्ला मी तुम्हाला देते. इथं ticket counter सोबतच एक लॉकर रुम आहे. तुमच्या बॅग्स, बॉटल्स, मोबाईल फोन, कॅमेरा, सगळं इथं ठेऊन तुम्ही वर गुरु रिंपोशेंच्या दरबारी जाता.
आत छोटी छोटी मंदिरं आहेत. शांत, स्वच्छ, आणि शेकडो वर्ष जुनी भींती चित्रांनी भरलेली. मदिरं तशी काळोखी,
शांत ! पण गायडेड टूर नसल्याने त्यांचे अर्थ समजून घेता येत नाहीत. काही भीकशूक मात्र दिसले, काही तरी खूप
लगबगीनं करत होते. ते इथेच राहतात. मला प्रश्न पडला की, ते त्यांचा खाण्या पिण्याचं सामान इथंवर कसे आणत असतील… काही मंदिरातून दरीचा व्हूव अप्रतिम दिसतो…
अनेक ढग या दर्‍यांच्या कुशीत येत. मह वार्‍याच्या तालावर निघून जात… ‘सुंदर’ हा शब्द कमी पडतो… इथला नजारा एक्सप्लेन करण्यासाठी आणि त्यावर आपण दहा हजार फुटांवर असल्याचा आनंद ! याच दहा हजार फुटांवर कडे तोंड करून काही बाकं बनवली आहेत. इथे बसून आम्ही सोबत आणलेला खाऊ खाल्ला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो…
Walk to Guru’s Glory ! Take Back Memories of Kingdom ! – ट्रेकच्या पायथ्याशी वाचलेल्या या बोर्डचा अर्थ हा ट्रेक केल्यावरच समजतो !
pearls of wisdom

QUICK INFO: 

the base camp (car park) of the trek is at an altitude of 8,530 ft above sea level…
the Monastery is located at 10,200 ft above sea level
a total height gain of 1700 ft takes place in the course of the trek.
Please note trekking at high altitudes can get difficult for people staying close to the sea.. hence gradual height gain is recommended.
The following two tabs change content below.
Works in Documentaries and Film Industry, Canada Always on a 'SEE FOOD' DIET

Latest posts by pdlight (see all)

No comments yet

Leave a Reply