GIRIVIHAR 2014

न्यूजरूममधली गडबड म्हणजे रोजचीच गोष्ट. हा शो ऑन एअर कधी होणार. अरे यार ते शूट लाईन अप करायचंय. व्हिज्युअल्स काय जातायंत चेक कर. पण जानेवारीचे तीन-चार दिवस हा सगळा कल्लोळ फेड आऊट होतो. त्याचं कारण, गिरीविहार रॉक क्लाइंम्बिंग कॉम्पिटिशन.
गिरीविहार ही एक गिर्यारोहणप्रेमींची संस्था आहे. संस्था, क्लब, ग्रुप असं काहीही म्हणा. पण ही लोक भन्नाट आहेत हे नक्की. दरवर्षी मी जाते या स्पर्धेला. इथे येणारे सगळे जण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात. पण रॉक क्लाइंम्बिंगच्या पॅशनने एकत्र येतात. कधी दोर्‍यांच्या मदतीने तर कधी नुसतीच शारीरिक ताकद पणाला लावून तो दगड किंवा एक भिंत सर करायची. चढून जायची, खडकांवर, पहाडाच्या भिंतीवर चढण्याची ही एकप्रकारची तयारीच. रॉक क्लाइंम्बर्सची ही कम्युनिटी आपल्या क्रिकेटीस्तानमध्ये खूपच छोटी आहे. पण ‘OPEN FOR ALL’ म्हणजे सर्वांना खुलीच आहे . कुणीही यावं. क्लाइंबिंगचे शूज चढवावे. मोठय़ानं ओरडावं, “climbing
– मग तुमच्या मागे एक spotter येऊन उभा राहील. तो आहे पाठीशी असं पाहून त्यानंतर चढायला लागावं थेट. नाहीच चढता आलं, किंवा हात सटकला तर crashpad आहेच. हा खेळ ८0 % मानसिक आहे आणि २0 % शारीरिक. बाहेरून पाहता हा खेळ कोणालाही सोप्पा वाटेल.
‘हे काय नुसतं असं भिंतीवर चढत जायचं,’ असं वाटू शकतं तुम्हाला पण करून पाहाल तेव्हा कळेल. कधी टाचांवर आपल्या देहाचा भार पेलून, त्या दगडी भिंतीवर चढत जाताना या आधीच्या आयुष्यात बुडवलेले योगा क्लास, अँरोबिक क्लास, अति झोपेच्या मोहाला बळी पडून खंड पडलेले मॉर्निंग वॉक हे सगळं डोळ्यासमोर येतं. पण एका अस्सल क्लाइंम्बरच्या मनात क्लाइंब करताना काही वेगळंच चालू असतं. मला या स्पर्धेत एक मुलगा भेटला, अंकित शर्मा असं त्याचं नाव. तो मूळचा बिकानेर- राजस्थानचा. भारताला क्लाइंबिंगच्या खेळात गोल्ड मेडल मिळवून देणारा तो पहिलाच क्लाइंबर. “क्लाइंब करते वक्त मेरी उंगलियोंको कभी चोट आती है, लेकीन वो दर्द मुझे अच्छा लगता है. इसलिये मै और ज्यादा क्लाइंब करता हूं. क्लाइंम्बिंग ही मेरी दवाई है.”
काहींना शिखरावर पोहोचण्यात आनंद तर काहींना तो प्रवास करण्याचीच किक. दगडांच्या चिरांमध्ये बोटं अडकवत, नैसर्गिक खोबण्यावर पायाने जाम बसवत हळूहळू दगडाला बिलगून अंदाज घेत पुढे चढायचं. निसर्गाच्या कुशीतले डोंगर, विशाल दगड. रॉक फेसेस हे या क्लाइंम्बर्सचे अड्डे. रूट पाहिल्याक्षणी आणि लगेच पूर्ण केल्यावर रूट फ्लॅश केला किंवा ऑन साईट केला असं कल्ला ऐकू येतो. कुणी चढत असेल आणि त्यांना उत्तेजन द्यायचं असेल तर ‘अरे. Ale! Ale! Common असे शोर ऐकू येईल. आता हे सगळं वातावरण अनुभवायचं असेल तर त्या स्पर्धेचे चार दिवस तुम्ही बेलापूर सीबीडी परिसरात यायला हवं. तुम्ही आल्या क्षणी, ‘अरे. कमॉन टॉप कर’ असा शोर ऐकू येईल. इथे लीड क्लाइंम्बिंग आणि स्पोर्ट क्लाइंम्बिंग, नॅचरल, ट्रॅडिशनल रॉक क्लाइंबिंग, आर्टीफिशियल वॉल क्लाइंम्बिंगमध्ये डायनो, बॉल्डरिंग असे अनेक प्रकार आहेत. एखाद्या लाकडी भिंतीवर नैसर्गिक रचनेची प्रतिकृती करत खोबणीच्या ऐवजी आर्टीफिशियल
होल्डस लावून आखलेले रूट्स इथे असतात.GV

 तीन दिवस इथे क्लाइंबिंग आणि क्लायम्बर्सची जत्रा भरतेय, असं म्हटलं तरी चालेल. काही चिमुकले क्लाइंब करणारे हात त्या आखलेल्या रूट्सवर जीव लावून प्रयत्न करताना दिसले. तर देशातल्या कानाकोपर्‍यात राहणारे अनेक बडे क्लाइंम्बर्स इथे आपलं टॅलेण्ट दाखवायला आले. इंडोनेशिया, फ्रान्स, अमेरिका, सिंगापूर,
रूमानियावरून आलेले उमदा क्लाइंम्बर्स भेटतात ते इथेच. ते स्पर्धेच्या निमित्ताने भारतात येतात.

कोणताही खेळ हा स्पर्धेशिवाय मोठा होत नसतो. जिथे स्पर्धा तिथे जिंकण्याची पॅशन. जिथे जिंकणं आलं तिथे प्रोत्साहन आलंच.का, सिंगापूर, रूमानियावरून आलेले उमदा क्लाइंम्बर्स भेटतात ते इथेच.

 

This article was first published in Lokmat daily newspaper

Watch this inspiring story of a 10 year old at the competition

 

The following two tabs change content below.

pdlight

Senior Producer at STAR INDIA Pvt Ltd
Currently making a GAME SHOW on a General Entertainment Channel. TV SHOW Producer, Was working in a News Channel earlier, anchored and produced travel, youth, interview, debate shows and events there. Curious about the ART WORLD. Ex Student of Bhau Daji Lad Museum Co-owner : Crashpad Productions - videos for love and life Love : Travelling, Adventure Sports, listening to Books if someone is read to read them loud for me Constantly on a 'SEE FOOD' DIET

Latest posts by pdlight (see all)

Categories: The Adventure Stories

Leave a Reply